मारामारी थापड थुपडीची झाली, पण.. ; तुरुंग प्रशासन वेगळंच सांगत असल्याचा धसांचा दावा

मारामारी थापड थुपडीची झाली, पण.. ; तुरुंग प्रशासन वेगळंच सांगत असल्याचा धसांचा दावा

| Updated on: Mar 31, 2025 | 5:01 PM

बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांना महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याची माहिती असल्याचं भाजप आमदार सुरेश धस

बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याची माहिती असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हंटल आहे. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या मारहाणीचं वृत्त बीड तुरुंग प्रशासनाने मात्र फेटाळलं आहे. फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. यात घुले आणि कराडचा काहीही संबंध नाही असंही तुरुंग प्रशासनाने म्हंटलं आहे. त्यावर धस यांनी म्हंटलं की, प्रशासन सांगताना इतरांचे नावं सांगतात. पण हा वाद मुख्य 2 टोळ्यांमध्ये झाला. एक चप्पल घालत नव्हते. आणि दुसऱ्या टोळीच्या मालकांनी दाढी ठेवली आहे.  मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडा थुपडाची झाली. पण धावाधावी सगळ्यांचीच झाली, असंही यावेळी सुरेश धस म्हणाले.

Published on: Mar 31, 2025 05:01 PM
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’बंद होणार? योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत? सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपली
Manoj Jarange : ‘…अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील’, असं वक्तव्य करत जरांगेंनी केली मोठी मागणी