केरळात भाजपाला एण्ट्री देणाऱ्या सुरेश गोपी यांनी घेतली केंद्रिय मंत्रिपदाची शपथ
केरळातील भाजपाला प्रवेश करुन देणाऱ्या जायंट किलर सुरेश गोपी यांनी केंद्रिय मंत्री पदाची शपथ घेतली आहे. अभिनेते ते राजकारणी असा त्यांचा प्रवास आहे.
केरळात प्रथमच भाजपाला प्रवेश मिळवून देणाऱ्या सुरेश गोपी यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या विजयाने केरळात प्रथमच भाजपाला शिरकाव मिळाल्याने हा भाजपासाठी मोठा विजय मानला जात आहे. केरळातील त्रिशूर लोकसभा मतदार संघात सुरेश गोपी जिंकल्याने स्थानिक कॉंग्रेस नेत्यांमध्ये हाणामारी देखील झाली आहे. या प्रकरणात कॉंग्रेसच्या दोन्ही गटांना एकमेकांविरोधात पोलिस तक्रार केली आहे. सुरेश गोपी यांनी अभिनेता ते नेता असा प्रवास केला आहे. त्यांनी भाकपाचे माजी राज्यमंत्री भाकपाचे नेते व्ही.एस.सुनीलकुमार यांचा 74,686 मतांनी पराभव केला आहे. तर कॉंग्रसचे मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
Published on: Jun 09, 2024 10:18 PM