संजय राऊत यांच्या कृतीवर सुषमा अंधारे यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्यांची जीभ…”

| Updated on: Jun 04, 2023 | 7:54 AM

शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थुंकल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शनिवारी त्यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान संजय राऊत यांच्या कृतीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे: शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थुंकल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शनिवारी त्यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान संजय राऊत यांच्या कृतीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “शिंदे गटाला स्वतःची नकारात्मकता लपवण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं आणि ते निमित्त ते शोधत आहेत.राज्यात मागे अनेक घटना घडल्या, त्यावेळी तुम्हाला आंदोलन करता आलं नाही का? महिलांचा अवमान करण्यात आला, अहवेला झाली त्यावेळी आंदोलन केलं नाही.शेतकरी आत्महत्येवर आंदोलन का केलं नाही.आजच्या दिवशी शिंदे गटाने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, कारण रेल्वे अपघातात आज लोकं मृत्युमुखी पडले आहेत.एवढी मोठी घटना घडली असताना लुटू पूटूचे खेळ खेळत आहेत. संजय राऊत यांच्या जीभेचा प्रॉब्लेम आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Published on: Jun 04, 2023 07:54 AM
मोठी बातमी! डॉ. लहाने यांच्या जागी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे सरकारचे आदेश, राजीनामा मंजूर?
नाना पटोले भावी मुख्यमंत्री ! प्रदेशाध्यक्षांचीही मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये एन्ट्री, कुठं झळकले बॅनर्स?