“कलंकला कलंक नाही म्हणायचं नाही, तर…?”, सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

| Updated on: Jul 12, 2023 | 2:28 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार ‘कलंक’ असा केला. यावरून महाराष्ट्राच्या राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे.

पुणे : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार ‘कलंक’ असा केला. यावरून महाराष्ट्राच्या राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “कलंकला कलंक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, अष्टगंध म्हणायचं का आम्ही. कलंकच आहे ते. त्यांच्या कार्यक्रमात अमित शाह आल्यानंतर चेंगराचेंगरीमध्ये ज्या श्री सदस्यांचा मृत्यू होतो. दुसऱ्यांदा अमित शाह येतात, पण श्री सदस्य मृतकांच्या घरी सांत्वन भेटही देत नाही. ही कलंकित करणारी गोष्ट नाही का? समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ अपघात झाला. अक्षरश: कोणाचंही प्रेम ओळखायला येत नव्हतं. त्यांचा अंतविधी चालू असताना एक पक्ष फोडून त्यांचा शपथविधी केला जातो…? सुषमा अंधारे पुढे काय म्हणाल्या, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Jul 12, 2023 02:28 PM
‘कलंक’वाद; उद्धव ठाकरे यांच्यावर तरुण भारतच्या अग्रलेखातून सडकून टीका, ‘कर्तव्यशून्य’ असा उल्लेख
“देवेंद्र फडणवीस कलंकित? पण तुमच्या फॅक्ट्रीत शेणाची खाण!”, नितेश राणे यांचा घणाघात