मध्यान्ह भोजन योजनेत 100 कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारे यांचा ‘या’ दोन नेत्यांवर खळबळजनक आरोप
सुषमा अंधारे यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सुषमा अंधारे यांनी या योजनेत तब्बल 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.
मुंबई, 26 जुलै 2023 | ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर मध्यान्ह भोजन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. याआधी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी घेत या योजनचे चौकशी करण्याची मागणी केली होती. सुषमा अंधारे यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सुषमा अंधारे यांनी या योजनेत तब्बल 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारीच सुषमा अंधारे यांनी मांडली. पत्रकार परिषदेत अंधारे यांनी या घोटाळ्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बोट दाखवलं. सुषमा अंधारे यांनी नेमके काय आरोप केले आहेत, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 26, 2023 08:53 AM