सुषमा अंधारे यांचा नवनीत राणा यांना टोला; म्हणाल्या, त्या बाईला धड….
उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, असं कसं सांगायचं. असा टोला नवनीत राणा यांच्यावर सुषमा अंधारे यांनी लगावला.
पुणे : उबाठाच्या सुषमा अंधारे म्हणाले, वर्षभरापूर्वी पक्षात फूट पडली. त्यानंतर तत्वज्ञानी लोकं तयार झाले. कुणी काहीतरी बोलत राहिले. पत्रकार, मुत्सद्दी बोलत राहिले. त्यात सुपारी दिलेले अनेक लोकं बोलत होत्या. उद्धव ठाकरे यांच्यात काही दम नाही, असं एक बाई म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही हे कसं सांगायचं. त्या बाईला मराठी येत नाही. उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, असं कसं सांगायचं. असा टोला नवनीत राणा यांच्यावर सुषमा अंधारे यांनी लगावला. आम्ही सुसंस्कारीत लोकं आहेत. आमच्यावर संस्कार आहेत. एवढी पतझड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे १०५ आमदार, गद्दारी केलेले ४० आमदार, सीबीआय, ईलेक्शन कमीशनसारख्या यंत्रणा कामाला लागली. सुरत, गुवाहाटी, गोवा, महाराष्ट्र येथील पोलीस यंत्रणा, राज्य आणि देशाची यंत्रणा सज्ज होती. लाखो पेड ट्रोलर्स, हे सर्व एकत्र आले तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कुणी संपवू शकत नाही, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण, यावर चर्चा सुरू आहे. देवेंद्र यांचे युग हे कपटी युग म्हणून ओळखले जाईल, असा आरोपही अंधारे यांनी केला.