सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला; ते, अमृता फडणवीस, चितळे यांच्याबद्दल कधीही का बोलत नाहीत?
सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना ते अमृता फडणवीस, चितळे यांच्याबद्दल कधीही का बोलत नाहीत असा सवाल केला आहे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव (जिल्हा सातारा) या जन्मगावी अनेकांनी हजेरी लावत अभिवादन केले. याचप्रमाणे पुण्यात देखिल अभिवादनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी हजेरी लावली. आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन ही केलं.
यानंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी महिलांनी कसे कपडे घालावेत यावरून विचारलेल्या प्रश्नावर आणि वादावर ही आपली भुमिका स्पष्ट केली. महिलांनी कोणते कपडे घालावेत, यासारख्या बाष्कळ विषयांवर चर्चा होते. पण गंभीर विषयांकडे लक्ष दिलं जात नाही. ही चर्चा करतानाही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं, असा आरोप अंधारे यांनी केला. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखिल निशाणा साधला.
तसेच देशात नॉन इशूज आणि बुलशीट इश्यू काढले जातात. तर कधी बुरखाच का घालता असा सवाल केला जातो. म्हणून आतताईपणा करायचा, कधी तुम्ही कपडे का घालत नाही म्हणून आतताईपणा करायचा…. हे योग्य नाही, असंही अंधारे म्हणाल्या. तसेच केतकी चितळे असो किंवा या सगळ्या तत्सम महिला… त्यांच्यावर कधी टीकेची राळ उठत नाही. किंवा देवेंद्रजी कधी सभागृह बंद पडणार नाहीत, असा टोला देखिल अंधारे यांनी फडणवीस यांना लगावला आहे.