ते तर रोजच आरोप आणि धुक्यांची धुळवड साजरी करतात; सुषमा अंधारेंनी शिंदेंना डिवचलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोजच आरोप आणि धुक्यांची धुळवड साजरी करतात असा टोला ही अंधारे यांनी मुख्यमंत्री यांना लगावला
अहमदनगर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भाजपावर चौफेर टीका केली. दरम्यान, त्यांच्या या सभेनंतर त्यांच्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, आमदार संजय शिरसाट, रामदास कदम, यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखिल टीका केली. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. यावेळी अंधारे यांनी, म्हटलं की सभेतच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की दुसरा दिवस ही शिमग्याचा आहे. त्यामुळे शिमग्याला बोंब मारली जात आहे. त्यामुळे त्यांनी किंमत द्यायची गरज नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोजच आरोप आणि धुक्यांची धुळवड साजरी करतात असा टोला ही अंधारे यांनी मुख्यमंत्री यांना लगावला.
Published on: Mar 07, 2023 07:30 PM