गौतमी ‘पाटील’च्या समर्थनार्थ अंधारे यांची रोखठोक भूमिका, दिला कोणाचा दाखला? लिहली लांबलचक…
गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा देताना महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही अशी धमकीच देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात कुठ राजकारण तर कुठ फक्त प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचीच जोरदार चर्चा रंगली आहे. तिच्या कार्यक्रमामुळे गोंधळ आणि गुन्हा दाखल असच चित्र पहायला मिळत आहे. यादरम्यान तिच्या कार्यक्रमातील नृत्यामुळे ती अडचणीत आली होती. तर आता पुन्हा एकदा ती भलतीच चर्चेत आली आहे. आता कळीचा मुद्दा ठरला आहे. तो तिचे आडनाव. तिचे अडनाव हे पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. तर गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा देताना महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही अशी धमकीच देण्यात आली आहे. हा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यावरून मी पाटील हे आडनाव लावणारच असा दम गौतमी पाटील हिने दिल्याने आता हा वाद वाढण्याची शक्यता असतानाच यात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकिय वळण लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणावरून उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गौतमीच्या समर्थनार्थ रोखठोक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही. तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडले. आडनावात वर्णश्रेष्ठतावाद असल्याचं म्हटलं आहे. इतकचं काय तर माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही असा टोला लगावला आहे.