‘वायफळ बडबड करून निष्कारण चर्चा वाढवू नये’; गावित यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शिवसेना महिला नेत्याची टीका
आदिवासी विकास मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित यांनी केलेल्या धक्कादायक विधानाचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत. त्यावरून सर्वच पक्षातील महिला नेत्यांकडून टीका होत आहे.
पुणे: 22 ऑगस्ट 2023 | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित यांनी एका अभिनेत्रीवरून केलेल्या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. तर गावित यांनी, ऐश्वर्या राय हिचे डोळे सुंदर असण्याचे कारण म्हणजे ती मासे खाते. तुम्ही देखील मासे खा असा सल्ला उपस्थितांना दिला होता. त्यावरून आता जोरदार टीका होत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. गावितांचं वक्तव्य हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. तर त्यांनी वायफळ बडबड करून निष्कारण चर्चा वाढवू नये. असंही त्या म्हणाल्या. तर गावित यांचे महिलांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आणि आहे. मंत्री महोदय असोत किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आपल्या विकास कामांच्या बाबतीत मार्गदर्शन करणारी आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारी असावीत. अशा पद्धतीची बडबड करून निष्कारण चर्चा वाढवून नये अशी अंधारे यांनी टीका केली आहे