पुण्यात पावसाने कहर केल्याने खडकवासला धरणाचे दरवाजे रात्री अचानक उघडण्यात आल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात मुळशी, खडकवासला धरण भरुन वाहू लागण्याने पुणे जलमय झाले आहे. पाऊस सुरु असल्याने येथील सिंहगड परिसरात रस्त्यावर पाणी भरल्याने लष्कराला पाचारण करावे लागले. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यातील एकतानगर भागात पाहणी केली आणि प्रशासनाच्या सुरु असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला. यावेळी लष्कराच्या जवानांनी पुण्यातील पुर आलेल्या परिसरातून अनेक नागरिकांची सुटका केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विश्रांतवाडीतील शांतीनगर आणि भारत नगर परिसरात दौरा केला आणि नागरिकांशी बोलून परिस्थितीचा अंदाज घेतला. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पुर येत असतो तरीही येथील लोकांसाठी कायम स्वरुपी पर्याय शोधलेला नाही असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.