सुषमा अंधारे यांची विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना कायदेशिर नोटीस
आता कोणी बदनामी कारण वक्तव्य केलं तर त्याविरोधात नोटीस पाठविण्याची त्यांनी कायदेशीर तयारी केली आहे. तर जे त्यांच्याविरोधात बदनामी करतील त्यांच्याविरोधात त्या ५ कोटी रूपये नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस पाठवणनार आहेत.
बीड : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आता बदनामी आणि बिनबूडाचे आरोप करणाऱ्यांना चांगलीच चपराक लगवण्याचे ठरवले आहे. त्यांच्यावर आता कोणी बदनामी कारण वक्तव्य केलं तर त्याविरोधात नोटीस पाठविण्याची त्यांनी कायदेशीर तयारी केली आहे. तर जे त्यांच्याविरोधात बदनामी करतील त्यांच्याविरोधात त्या ५ कोटी रूपये नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस पाठवणनार आहेत. अशीच नोटीास त्यांनी बीड मधील वैजनाथ वाघमारे यांच्याविरोधात पाठवली आहे. तर वैजनाथ वाघमारे हे त्यांचे विभक्त पती असून त्यांनी काही दिवसांपुर्वीच यांनी अंधारे यांच्यावर टीका करताना काही आरोप केले होते. तर त्यांच्यातील हा वाद आता आता चव्हाट्यावर आला आहे. तर वाघमारे यांनी शिवसेना फूटीनंतर शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
Published on: Jul 16, 2023 08:00 AM