बाईंचा तसा तो नादच आहे.. ; चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
'तुमच्या सारखे 56 मी पायाला बांधून फिरते' या चित्रा वाघ यांच्या विधानावर आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत टोलेबाजी केली.
एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. अनेकजण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली. पण झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोक कधीच आपला इमान विकत नाहीत, असा टोला उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरुन विरोधकांना बोलताना ‘तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते’ असं म्हंटलं होतं. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आज सुषमा अंधारे यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी अंधारे म्हणाल्या की, एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, त्या तशाच वागत राहतात. त्यानंतर सोशल मिडियावर अनेकजण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली. पण झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोक गरीब असतात पण ते कधीच आपला इमान विकत नाहीत. त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कोणी देऊ नका, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.