राणे कुटुंबाबद्दल अपार करुणा, बुद्धिमत्तेचे कौतुक, सुषमा अंधारे यांचा खोचक टोला

| Updated on: Apr 29, 2023 | 8:25 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्याचा मुलगा आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांचा 'म्याव' असा उल्लेख करून त्यांना डिवचले आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्याचा मुलगा आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांचा ‘म्याव’ असा उल्लेख करून त्यांना डिवचले आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे कुटुंबीयांच्या बुद्धिमत्तेचे खूप खूप कौतुक करते अशा शब्दात खास टोला लगावला आहे. आपण त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करू या. राणे कुटुंबीयबद्दल काहीही बोलू नये. आम्ही त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करतो आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे खूप खूप कौतुक करते. बाकी ज्यांना खोक्यांच्या भाषेशिवाय काही कळत नाही ते त्याच भाषेत बोलतात. राहिला प्रश्न आमच्या सन्माननीय पक्षप्रमुख यांचा तर सहा तारखेला खेडला सभा आहे त्या सभेआधी ते बारसूला जाऊन प्रकल्पग्रस्तांना भेटतील, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 29, 2023 08:25 PM
कोकणातील जनतेला रोजगार मिळत असताना असं राजकारण, इतकं दुर्दैवी काहीही नाही; शिवसेना मंत्र्याचा ठाकरेंवर पलटवार
गुलाल, विजयाचा जल्लोष आणि धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर