Sushma Andhare : भाजपमध्ये ताकद असेल तर,… सुषमा अंधारे यांचे आव्हान
भाजप भाड्याने बोलावलेला पक्ष झालाय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधून माणस येऊन यांनी सत्ता स्थापन केल्याचाही आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
पुणे : उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात भाजपवर जोरदार फटकेबाजी केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, असं वागण तुम्हाला शोभते काय. काय बोलता तुम्ही. ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केला. दादांच्या बोलण्यावर टीका करणारे तुम्ही. त्याच धरणातलं पवित्र तीर्थ डोक्याला डोळ्याला लावून फिरता तुम्ही असा घणाघातही भाजपवर केला. शिवसेना संपल्यासारखी वाटते काय. ताकत आहे का तुमच्यामध्ये असा सवाल थेट भाजपला केला. शिवसेना एवढी स्वस्त वाटते का. असे मर्दासारखे भीडा, निवडणुका घ्या. बघा. किसमे कितना हैं दम. भारतीय जनता पार्टी एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात वेगळं होतं. आता भाजपचा कारभार कसा सुरू आहे. भाड्याने बोलावलेला पक्ष झालाय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधून माणस येऊन यांनी सत्ता स्थापन केल्याचाही आरोप सुषमा अंधारे यांनी केला. कीटकनाशकाची फवारणी केल्यावर पाखर उडतात. तशी इंडियाच्या बैठकीचा फिव्हर वाढायला लागला तशी काही लोकं उडायला लागली असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.