‘फडणवीसांचं महत्व कमी झालंय, बऱ्यापैकी साइड लाइन केलं जातय’; अंधारे यांची सडकून टीका
यानंतर त्यांनी दिल्ली दौरा करत प्रफूल्ल पटेल यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि खाते वाटपाचा प्रश्न निकाली काढला. मात्र यावेळी त्यांच्याबरोबर ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यामुळे राज्यात अजित पवार यांची राजकीय ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.
नांदेड : राज्याच्या मंत्रिंडळाचा २ जुलैला विस्तार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाच धक्का देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी दिल्ली दौरा करत प्रफूल्ल पटेल यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि खाते वाटपाचा प्रश्न निकाली काढला. मात्र यावेळी त्यांच्याबरोबर ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यामुळे राज्यात अजित पवार यांची राजकीय ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच खाते वाटपावेळी शिंदे गटाचा विरोध असतानाही अजित पवार यांच्याकडे अर्थखातं गेल्याने शिंदे गाटाची गोची झाल्याचे बोललं जात आहे. तर हा फडणवीस यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांनी टोला लगावताना, ‘मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अंतिम असेल असे मला वाटत नाही. मंत्रीमंडळाचा कणा अर्थ खाते आहे. यामध्ये देवेद्र फडणवीस यांचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. तसेच या आधी जेव्हा कधी मंत्रिमंडळाचे विस्तार झाले, त्या आधी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. परंतु आता अजित पवार एकटेच दिल्लीला गेले. यावरून देवेंद्र फडणवीसांचं महत्व कमी झालं आहे’. तर भाजप फडणवीस यांना साईड लाईन करत असल्याचं दिसत आहे. किंबहुना महाराष्ट्रातली फडणीस यांच्या बद्दलची नकारात्मकतेची कीर्ती केंद्रापर्यंत पोहोचल्यानेटच त्यांना बऱ्यापैकी साइड लाइन केलं जात असल्याचंही अंधारे यांनी म्हटलं आहे.