आम्ही पुन्हा सभागृहात आमचा आवाज बुलंद करू – Bunty Bhangadia
सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने बारा आमदारांचं निलंबन मागे घेतलंय. निलंबित भाजपा (BJP) आमदारांनी या निर्णयाचं स्वागत करत आभार मानले आहे. चिमूर मतदार संघाचे निलंबित भाजपा आमदार बंटी भांगडिया (Bunty Bhangadia) यांना पेढा आणि गुलाल लावून अभिनंदन करण्यात आलं. राज्य सरकारनं आमच्यावर अन्याय केला. त्याचा विरोध करून आम्ही न्यायालयात गेलो, असं ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने बारा आमदारांचं निलंबन मागे घेतलंय. निलंबित भाजपा (BJP) आमदारांनी या निर्णयाचं स्वागत करत आभार मानले आहे. चिमूर मतदार संघाचे निलंबित भाजपा आमदार बंटी भांगडिया (Bunty Bhangadia) यांना पेढा आणि गुलाल लावून अभिनंदन करण्यात आलं. ‘राज्य सरकारनं सूडबुद्धीनं आमचं निलंबन केलं होतं, हे केवळ आमचं निलंबन नव्हतं तर आम्ही ज्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतो, त्या मतदार संघातील लाखो मतदारांवर एकप्रकारे अन्याय होता. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ही एकप्रकारे चपराक दिली आहे, आम्ही पुन्हा सभागृहात आमचा आवाज बुलंद करू, असं बंटी भांगडिया यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं आमच्यावर अन्याय केला. त्याचा विरोध करून आम्ही न्यायालयात गेलो, असं ते म्हणाले.