मुंबईच्या समुद्रामध्ये पुन्हा एकदा संशयास्पद बोट; यावेळी दोन पाकिस्तानी नागरिक
याची माहिती नौदलाकडून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या संदर्भात पोलिसांसह नौदलाकडून त्या बोटीचा शोध घेतला जात आहे
मुंबई : समुद्र किनाऱ्यापासून 100 सागरी मेल अंतरावर असणाऱ्या समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद बोट आढळली. त्यामुळे भारतीय नौदलासह पोलिसांत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जवळील पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळली आहे. तर याची माहिती नौदलाकडून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या संदर्भात पोलिसांसह नौदलाकडून त्या बोटीचा शोध घेतला जात आहे. तर या बोटीवर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर या बोटीवर हे लोक कोण आहेत? ते नागरिक आणि बोट कुठून आली आहे? याबद्दल चौकशी सुरू आहे.
Published on: Apr 01, 2023 03:21 PM