‘या’ मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्मदहन; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

| Updated on: Feb 11, 2023 | 8:13 AM

आज बुलढाण्यामध्ये स्वाभिमान शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. रविकांत तुपकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार आहे. त्यांनी सरकारला आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाहा...

बुलढाणा : कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. रविकांत तुपकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार आहे. रविकांत तुपकर यांनी सरकारला आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. काल रात्री 15 हजार शेतकऱ्याच्या खात्यावर 10 कोटी पिकविम्याचे जमा केल्यानंतरही रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम आहेत. रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.आज बुलढाण्यामध्ये स्वाभिमान शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे.

Published on: Feb 11, 2023 08:12 AM
तुमचेही पाय चिखलाचेच; ‘सामना’तून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल? प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावाची चर्चा सुरु