सावरकर हे शिंदेंचे दैवत; महाराष्ट्राचं दैवत जगदंबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्ला करत शिंदेंचा समाचार घेतला आहे. वडेट्टीवार यांनी, सावरकर हे एकनाथ शिंदे यांचे दैवत आहेत
भंडारा : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असून त्यांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं होतं. त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्ला करत शिंदेंचा समाचार घेतला आहे. वडेट्टीवार यांनी, सावरकर हे एकनाथ शिंदे यांचे दैवत आहेत. तर महाराष्ट्राचे दैवत जगदंबा, शिर्डीचे साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्यांचा अपमान झाला तर महाराष्ट्राचा अपमान होतो. सावरकरांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नव्हे, असा खरमरीत टोला वडेट्टीवार यांनी शिंदे यांना लगावला आहे.
Published on: Apr 10, 2023 09:38 AM