काँग्रेस आणि राहुल गांधींना सावरकर समजणारच नाहीत; भाजप नेत्याचा सावरकर यात्रेतून पलवार

| Updated on: Apr 03, 2023 | 9:14 AM

सावरकरांचा होणारा अपमानावरूनच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर सावरकर गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आल्याचेही पडळकर म्हणाले

सांगली : देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रचंड मोठं योगदान आहे. काळ्या पाण्याची शिक्षा असो किंवा मरण यातना असो, त्या देशातील तरुणांना आजही प्रेरणादायी आहेत. आज देश, महाराष्ट्र त्यांच्या विचारावरती प्रचंड प्रेम करतोय. त्यांच्या विचारांवर पुढे जाण्याची सर्व तरुण युवकांची भूमिका आहे. परंतु या वर्षाभरामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते वारंवार स्वातंत्रवीर सावरकरांच्या अपमान करत आहेत. राहुल गांधी हे वारंवार स्वातंत्रवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जात टीका करत असल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीच्या आटपाडी मध्ये स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा दरम्यान बोलत होते. तर मुळातच काँग्रेस आणि राहुल गांधींना सावरकर समजणारच नाहीत. तर सावरकरांचा अपमान करताय ते महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही असेही त्यांनी सुनावलं आहे. तर सावरकरांचा होणारा अपमानावरूनच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर सावरकर गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आल्याचेही पडळकर म्हणाले

Published on: Apr 03, 2023 09:14 AM
मविआचे नेते आंदोलने करण्यात व्यस्त होते; भाजप नेत्याची टीका
उद्धव ठाकरेंचं आता नाव बदललंय, भाईजान केलंय; कुणी केली टीका?