सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही, असं म्हणणं हा ढोगीपणा; भाजप नेत्याची पवार यांच्यावर टीका

| Updated on: Apr 10, 2023 | 7:35 AM

पवार यांनी, सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे म्हटलं होतं. त्यावर टीका करताना पाटील यांनी पवार यांच्यावर घणाघात केला आहे

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याची सुपारी घेतल्यासारखे काँग्रेस नेते राहुल गांधी ही बोलत असतात. त्यांच्याकडून सावरकरांचा वारंवार अपमान केला जातोय. राहुल गांधींनी स्वातंत्र्य युध्द तसेच लढणारे क्रांतीकारक आणि सावरकरांबद्दल अभ्यास केलेला नाही. आणि ते स्वातंत्र्यवीरांचा अपमान, हीन वक्तव्य करीत आहेत, अशी टीका पालकमंत्री, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राहुल गांधीवर केली. त्याचदरम्यान त्यांनी, शरद पवार यांच्यावरही निशाना साधला.

पवार यांनी, सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे म्हटलं होतं. त्यावर टीका करताना पाटील यांनी पवार यांच्यावर घणाघात केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली तर ते कोणालाही समजू शकणार नाहीत. तसेच त्यांची सामाजिक भूमिकाही खूप मोठी होती. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं हा ढोगीपणा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Published on: Apr 10, 2023 07:35 AM
अयोध्या दौऱ्यावर घोडे गाड्या घेऊन गेलेत, नुसता तमाशा; शिवसेनेच्या नेत्याचा शिंदेंना टोला
योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदे यांनी सविस्तर सांगितलं…