‘सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना उद्धव ठाकरे जोड्यानं मारणार का?’, शिवसेना नेत्याचा सवाल
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जे सावरकरांच्या बद्दल वाईट बोलतील त्यांना जोड्याने मारा. मग आता उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन जोड्याने मारतील का?
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावत ही आमची विनंती नाही तर इशारा असल्याचे कालच्या सभेत म्हटलं होतं. त्यानंतर आता यावरून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केल्या आहेत. तर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील यावरूनच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना चिमटा काढत दिल्लीत जाऊन सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोड्यानं मारणार का? असा सवाल केला आहे.
संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांना आता जाणवायला लागलं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी सतत वादग्रस्त बोलतात. ते माफी मागत नाहीत. त्यामुळे जनता काँग्रेस पासून तर दूर आहे. आता लोकही उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेपासून दुर जातील म्हणून ते असे बोलत आहेत. आपण काँग्रेस सोबत जाऊन मोठी घोड चूक केलेली आहे हे त्यांना कळल आहे. पण त्याचा आता काही उपयोग नाही. जसे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जे सावरकरांच्या बद्दल वाईट बोलतील त्यांना जोड्याने मारा. मग आता उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन जोड्याने मारतील का? संजय राऊत दिल्लीला जाऊन जोड्याने मारतील का?