सभेत थेट इशारा, आता संजय राऊत दिल्लीत राहुल गांधीशी चर्चा करणार
सावरकर यांच्यावरून काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले, ‘सावरकर हे आमच्या श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील. सावरकरांकडूनच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेले खडे बोल सुनावले. तसेच आम्ही विनंती नाही तर थेट जाहीर इशारा देत आहोत असं म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करू नका, आमचे दैवत आहेत. त्यांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर हे सुनावलेले खडे बोल म्हणजे फिक्सिंग होती, अशी इतर सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. त्यावर खासदार संजय राऊत यांनी या संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच लवकरच आपण दिल्लीत जाणार असून राहुल गांधींची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
सावरकर यांच्यावरून काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले, ‘सावरकर हे आमच्या श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील. सावरकरांकडूनच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते. सावरकरांच्या बाबतीत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांच्याशीही याबाबत बोलल्याचे राऊत म्हणाले.