राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल; काय कारण? पाहा…

| Updated on: Apr 13, 2023 | 10:54 AM

Rahul Gandhi : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधींच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : राहुल गांधींच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी हा दावा केला आहे. 15 तारखेला पुणे न्यायालयात मानहानीच्या दाव्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये भाषण केलं होतं. एका मुस्लिम व्यक्तीला सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता. असं त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला आहे. राहुल गांधींची ही कथा काल्पनिक आहे, असं म्हणत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Published on: Apr 13, 2023 10:28 AM
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येण्याच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; पाहा…
Nashik City Bus : नाशिककरांच्या लाइफलाईनला ब्रेक, सिटीलिंक बससेवा ठप्प