T20 वर्ल्ड कप विजयी परेड : ‘एवढी मोठी गर्दी पाहून हृदय…,’ काय म्हणाले मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे पोलिस

| Updated on: Jul 06, 2024 | 8:12 PM

भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईत आगमन झाल्यानंतर मरीन ड्राईव्हच्या एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत प्रवास लाखोंच्या गर्दीला हाताळणे आणि खेळाडूंच्या सुरक्षेसह मुंबईकरांची देखील सुरक्षा करणे अशा दुहेरी आव्हानाचा सामना मुंबई पोलिसांनी यशस्वीपणे केला आहे. याबद्दल मरीन ड्राईव्हच्या पोलिसांनी काय म्हटले पाहा...

भारताने साऊथ आफ्रीकेला नमवून T20 वर्ल्ड कप जिंकल्या नंतर आधी दिल्लीत क्रिकेट खेळाडूंचा सत्कार झाला,नंतर ही भारतीय टीम सायंकाळी मुंबईत मरीन ड्राईव्हवर दाखल झाली. त्यावेळी तेथे लाखो क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती.आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी लाखो मुंबईकर मरिन ड्राईव्हवर जमले होते. या T20 वर्ल्ड कप विजयी परेडमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर होती. पावसाचे दिवस होते. तरी मुंबई पोलिसांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळल्याने सर्वत्र मुंबई पोलिसांचे कौतूक होत आहे. मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातील पोलिसांचा या कामगिरीबद्दल मुबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एवढी गर्दी आयुष्यात पहिल्यांदा पाहील्याचे मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी एका महिला गुदमरत असताना तिला आपल्या खांद्यावर उचलून गर्दीतून बाहेर काढणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल पिंजारे यांचे विशेष कौतूक होत आहे.

Published on: Jul 06, 2024 08:11 PM
निलेश लंके यांचे जनआक्रोश आंदोलन, पत्नी आणि आईने आंदोलन स्थळी चुल पेटविली
पराभव झाला,पण ‘रन रेट’ वाढत आहे,पुढल्या वेळी तर थेट येथूनच उभा राहतो,’ जानकर यांनी कोणाला दिले आव्हान