Pruthaviraj Chavan | पक्षाचा आदेश धुडकावून भाजपला मतदान करणाऱ्या सात आमदारांवर कारवाई करा, पृथ्वीराज चव्हाण यांनी रेटली मागणी

| Updated on: Aug 22, 2022 | 6:09 PM

Pruthaviraj Chavan | विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षादेश धुडकावून क्रॉस मतदान केले. त्याविरोधात कारवाईची मागणी रेटण्यात आली आहे.

Pruthaviraj Chavan | पक्षाचा आदेश धुडकावून विधान परिषद (Legislative Council) निवडणुकीत भाजपला (BJP) मतदान (Cross Voting) करणाऱ्या काँग्रेस पक्षातील सात आमदारांविरोधात (7 Congress MLA) कडक कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthaviraj Chavan) यांनी केली आहे. या 7 आमदारांनी पक्षाचा आदेश धुडकावला आणि भाजपला मतदान केले. ही गंभीर बाब असल्याने त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांच्या मागणीनंतर पक्षाने याप्रकरणी चौकशीसाठी वनप्रकाश यांना पाठविले होते. त्यांनी चौकशी करुन अहवाल तयार केला आणि तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आता या सात जणांविरोधात काय कारवाई करायची याचा निर्णय सोनिया गांधी घेतली असे त्यांनी सांगितले. आता हे सात आमदार कोण, त्यांची नावे त्यांनी उघड केली नाहीत.

Published on: Aug 22, 2022 06:09 PM
Ashok Chavan on Abdul Sattar | सत्तार यांची भेट घेतली, तर काय अनुचित केलं? सत्तार यांच्या भेटीवरुन अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण
Ahmednagar : काय सांगता..! सोन्याच्या कपामध्ये ग्राहकांना मिळणार चहा