बेकायदा फेरीवाल्यांना नोटीस का पाठवता? थेट कारवाई करा,मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश

| Updated on: Apr 20, 2024 | 9:00 AM

बेकायदा फेरीवाल्यांना नोटीस का पाठवा? पोलिसांची मदत घेऊन विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यावर थेट कारवाई करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

Mumbai High Court : मुंबईमधील बेकायदा फेरीवाल्यांना नोटीस का पाठवता? थेट त्यांच्यावर कारवाई करा असा आदेश मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिला आहे. बेकायदा फेरीवाल्यांना कारवाईची पूर्वकल्पना म्हणून नोटीस देण्याची गरज नाही. सार्वजनिक जागेवर विनापरवाना व्यवसाय करण्याचा कोणताही हक्क नाही असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले आहेत. एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर पोलिसांची मदत घेऊन बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईची धडक मोहीम राबवा असे देखील निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत .

Published on: Apr 20, 2024 09:00 AM
Supreme Court On Dhangar Reservation : धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
दोन महिन्यामध्ये शिंदे दिसणार नाहीत, भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य