Raigad Irshalwadi Landslide | हृदयद्रावक! रायगडच्या इर्शालगडाच्या पायथ्याला असणाऱ्या आदिवासी वाडीवर काळाचा घाला, चार जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 20, 2023 | 10:40 AM

२०२१ साली महाडमधील तळीये गावात दरड कोसळून रडीखाली 35 घरे दबली गेली होती. तर ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृत्यू झाला होता. तर २०१४ साली आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर देखील अशीच दरड पडल्याने संपुर्ण गावच गाडलं गेलं होतं.

रायगड, 20 जुलै 2023 | राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. तर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 6 पैकी तब्बल 4 नद्यांच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान पुन्हा एकदा महाडमधील तळीये आणि आंबेगाव तालुक्यातील माळीण या दुर्घटनांच्या कटू आठवणी ताजा झाल्या आहेत. २०२१ साली महाडमधील तळीये गावात दरड कोसळून रडीखाली 35 घरे दबली गेली होती. तर ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृत्यू झाला होता. तर २०१४ साली आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर देखील अशीच दरड पडल्याने संपुर्ण गावच गाडलं गेलं होतं. आता अशीच घटना बुधवारी रात्री खालापूरजवळील इर्शालगडाच्या पायथ्याशी झाली आहे. येथे दरड कोसळून 50 ते 60 घरांची वस्तीच दरडीखाली दबली गेली आहे. त्यामुळे सुमारे 200 जण दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी त्याची माहिती पोलीस प्रशानाला कळवली असून मदतकार्यास सुरुवात केली. सध्या एनडीआरएफची टीम, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन मदतकार्य आणि बचाव कार्य करत आहे. तर अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून 8108195554 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.

Published on: Jul 20, 2023 09:07 AM
“…नाहीतर ‘त्या’ अधिकाऱ्यांना जेलमध्ये जावं लागेल”, मुंबई महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक
“…म्हणून मी मंत्रिपदाचा दावा सोडला,” बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं कारण…