“सुषमा अंधारे यांना भाडेतत्वावर…”, तानाजी सावंत यांची खोचक टीका, म्हणाले, “तुमचा सर्च रिपोर्ट…”
राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला ठाकरे गटाला भाडेतत्वावर दिलं आहे, असा टोला तानाजी सावंत यांनी लगावला आहे.
परभणी : राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला ठाकरे गटाला भाडेतत्वावर दिलं आहे, असा टोला तानाजी सावंत यांनी लगावला आहे. तानाजी सावंत यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. तानाजी सावंत एका कार्यक्रमासाठी परभणीत आले होते. “सुषमा अंधारे यांना आमच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा पूर्ण सर्च रिपोर्ट आमच्याकडे आहे. आमच्या रणरागिनी अजून शांत आहेत. तुमचं एकदा सगळं संपुदे, ज्यावेळेस आमच्या रणरागिनी मैदानात उतरतील, त्यावेळेस तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही”, अशी जहरी टीका तानाजी सावंत यांनी केली आहे.
Published on: May 27, 2023 09:59 AM