Tanaji Sawant : शिंदे गटाचे आमदार उदय सामंतांवर हल्ला, हल्ल्याचे उत्तर 8 दिवसात मिळेल, तानाजी सावंतांचा इशारा

| Updated on: Aug 03, 2022 | 9:51 AM

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करायचा होता. पण तानाजी सावंतांवर हल्ला केला गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वातावरण ढवळून निघालंय.

पुणे: शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (uday samant) यांच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला. यावर आमदार तानाजी सावंतांवर (tanaji sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही शांत आहोत. याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं कुणी समजू नये. आमच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. आम्हीही चार हात करायला तयार आहोत, असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे. तर मी आज कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. माझ्यावरील हल्ल्याची रिअॅक्शन चार आठ दिवसात मिळेल. काय होईल मला माहीत नाही. पण याची रिअॅक्शन माझे कार्यकर्ते देतील, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे. दरम्यान, सामंत यांच्यावरील हा हल्ला शिवसैनिकांनी (shivsena) केल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करायचा होता. पण तानाजी सावंतांवर (tanaji sawant)  हल्ला केला गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

Published on: Aug 03, 2022 09:47 AM
Today Petrol, Diesel Rate : महागाईचा फटका, सीएनजीच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल, डिझेलची काय स्थिती?
Tanaji Sawant : सोज्वळ चेहरे करून आमचे आईबाप काढायचे, ही आमची राजकीय संस्कृती नाही, सावंतांची टीका