काल राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं, आज शिंदे गटातील मंत्री भेटीला

| Updated on: Oct 17, 2022 | 11:55 AM

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. त्यानंतर आता आज शिंदे गटाचे नेते

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. कालच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता आज शिंदे गटाचे नेते, आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. शिवतीर्थ या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी जात त्यांनी ही भेट घेतली. या भेटीदरम्यान, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Published on: Oct 17, 2022 11:55 AM
पुण्यातील F C रोडवरील दुकानाला भीषण आग, पाहा व्हीडिओ…
आतापर्यंत हाती आलेल्या निकालात भाजप नंबर वन, जाणून घ्या शिंदे, ठाकरे गटाच्या वाट्याला किती ग्रामपंचायती?