सत्तांतरासाठी 2019 पासूनच शिंदे-फडणवीस आणि माझ्यात 100-150 बैठका झाल्या; शिवसेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट

| Updated on: Mar 28, 2023 | 9:44 AM

CM Eknath Shinde Devendra Fadnavis Meeting : राज्यात सत्तांतरावेळी बैठका होत होत्या. 2019 पासूनच या बैठका होत होत्या आणि या बैठकांना आपण हजर राहत होतो, असं राज्य सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्याने सांगितलं आहे. पाहा व्हीडिओ...

धाराशिव : राज्यात सत्तांतर झालं तेव्हा वारंवार बैठका होत होत्या. 2019 पासूनच या बैठका होत होत्या आणि या बैठकांना आपण हजर राहत होतो, असं राज्य सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्याने सांगितलं आहे. “2019 पासूनच राज्यात सत्तापरिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात बैठका होत होत्या. 2 वर्षात 100 ते 150 बैठका या सगळ्यावर झाल्या. आम्ही हे सगळं सांगून करत होतो. झाकून ठेवत नव्हतो. उजळ माथ्याने करत होतो. आधीपासूनच सत्ता बदण्याचे काम सुरु होतं. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रमधील आमदार यांची मनधरणी करण्याचं काम सुरु होतं. अन् अखेर त्याला यश आलं”, असं मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 28, 2023 09:44 AM
सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही- शरद पवार
एकनाथ शिंदे यांना सावरकरांचं कार्य माहिती नाही, ते कागद केवळ वाचतात; संजय राऊत यांचा घणाघात