पन्हाळ गडावर बंदची हाक? पर्यटकांना बंदी? पोलीसांचा फौजफाटा ही तैनात; कारण काय?

| Updated on: May 25, 2023 | 2:59 PM

त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशकरण्याच्या तर धूप दाखविण्याच्या कारणावरून सध्या राजकारण चांगलचं तापलेलं आहे. याचदरम्यान आता कोल्हापूरात देखील असा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.

पन्हाळा (कोल्हापूर) : काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात हिंदू-मुस्लिम धार्मिक तेड निर्माण केला जात असल्याचे दिसत आहे. छ. संभाजीनगर, अकोला, आहमदनगर अशा ठिकाणी दोन समुहात राडे झाले आहेत. ते शांत होतात न होतात तोच त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशकरण्याच्या तर धूप दाखविण्याच्या कारणावरून सध्या राजकारण चांगलचं तापलेलं आहे. याचदरम्यान आता कोल्हापूरात देखील असा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापुरमधील ऐतिहासिक पन्हाळगडावर असलेल्या तानपिर मजारिची रात्री अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. हिंदू मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या तानपीर मजारची तोडफोड झाल्याने पन्हाळगडावर आज बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पन्हाळगडावरील सर्व व्यवहार आज बंद आहेत. शिवाय गडावर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. त्याचबरोबर धार्मिक तेढ वाढू नये यासाठी पन्हाळगडावर जाणाऱ्या पर्यटकांना बुधवार पेठ परिसरातच रोखण्यात आलं आहे. त्यामुळे एरवी गजबजलेला पन्हाळगड आज ओस पडलेला पाहायला मिळत आहे.

Published on: May 25, 2023 02:59 PM
प्रकाश आंबडकर यांच्या इशारा योग्य? ठाकरे गटाचा नेताच म्हणाला, ”त्यात…”
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा नारिकांना नेमका काय लाभ मिळला? काय म्हणाले लाभार्थीं ?