तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ? रोहीत पाटील यांच्याशी लढत होणार?

| Updated on: Oct 19, 2024 | 3:15 PM

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटलेला नाही. हा मतदार संघ अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जाईल असे म्हटले जात असून प्रभाकर पाटील हे हाती घड्याळ बांधतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील यांचा सामना रोहीत पाटील यांच्याशी होणार असे म्हटले जात आहे.

तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीत कवठेमहांकाळ जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही या मतदार संघातून राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होते काय याकडे लक्ष लागले आहे. कारण भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रभाकर पाटील राष्ट्रावादीच्या अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. महायुतीत हा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार हे निश्चित झालेले नाही. मात्र भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणूक लढविण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे. महायुतीत हा मतदार संघ राष्ट्रवादी अजितदादा यांच्या वाट्याला जाईल असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीत अजितदादांकडे सक्षम उमेदवार नसल्याने प्रभाकर पाटील राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधतील असे म्हटले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित आरआर पाटील रिंगणात उतरणार असल्याचे नक्की असल्याने या मतदार संघात राष्ट्रवादी दोन गटात सामना रंगणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Oct 19, 2024 03:14 PM