Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गला रेड अ‌ॅलर्ट,  150 ते 180 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
Four Minute Twenty Four Headlines

Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गला रेड अ‌ॅलर्ट, 150 ते 180 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

| Updated on: May 16, 2021 | 4:30 PM

  तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग:  तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शांळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही वैभववाडी तालुक्यात पडला आहे. हवामान खात्याकडून सिंधुदुर्गला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेग वाढत जाण्याची शक्यता आहे.ताशी 150 ते 180 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहेय किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालाय.

राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातव यांच्याविषयी बोलताना विजय वडेट्टीवार ढसाढसा रडले
Kirit Somaiya | अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी प्रकाश जावडेकरांना भाजपचे पत्र