Special Report | भाजप आमदार प्रशांत बंब यांना शिक्षकपत्नीचा फोनकॉल
प्रशांत बंब भाजपचे गंगापूर-खुल्ताबादचे आमदार आहेत. शिक्षक ज्या गावी नोकरी करतात, त्याच गावात त्यांनी राहण्याचा नियम आहे. मात्र असंख्य शिक्षक तालुक्यावर राहत असून भाडेस्वरुपात सरकारची लूट करत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला होता.
मुंबई : भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल केलेल्या विधानाचा वाद थांबत नाहीय. काल शिक्षक आणि आमदार प्रशांत बंब यांच्यातली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आता त्याच शिक्षकाची पत्नी आणि प्रशांत बंब यांच्यात फोनवरुन घमासान झालंय. संबंधित महिलेनं थेट तुम्ही किती खोटी कागदपत्रं तयार केली., ते लोकांना सांगू का म्हणून थेट आमदार प्रशांत बंब यांनाच इशारा दिलाय. प्रशांत बंब भाजपचे गंगापूर-खुल्ताबादचे आमदार आहेत. शिक्षक ज्या गावी नोकरी करतात, त्याच गावात त्यांनी राहण्याचा नियम आहे. मात्र असंख्य शिक्षक तालुक्यावर राहत असून भाडेस्वरुपात सरकारची लूट करत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला होता.
Published on: Aug 27, 2022 02:04 AM