Tejas Thackeray : तेजस ठाकरे राजकारणात येणार? शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात तिसरे ठाकरे मैदानात?

| Updated on: Aug 04, 2022 | 9:34 AM

आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एन्ट्रीची चांगलीच चर्चा आहे. तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमात आतापर्यंत फारसे दिसले नाहीत. पण, ठाकरे कुटुंबातील आदित्य, अमित यांच्यानंतर राजकारणात तेजस ठाकरेंची चर्चा आहे. 

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यानंतर तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.  यावरुन संघर्षाच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शेवटचं अस्त्र बाहेर काढल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन वेगळा मार्ग निवडल्यानं ठाकरेंना मोठा धक्का बसला. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. आमदार-खासदारांनंतर शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदेंकडे जात असल्यानं ठाकरे घराणं त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहे. अशातच आता तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंचे पूत्र तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, याला कारण ठरत आहे ती तेजस ठाकरेंची सार्वजनिक कार्यक्रमातली उपस्थिती.

Published on: Aug 04, 2022 09:29 AM
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी, जेल की बेल?
Editorial of Saamana : नड्डाजी, जरा जपून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना शिवसेनेचा सल्ला