Video : ट्रक आणि ट्रॉलीची समोरासमोर धडक, अपघातात 8 जण ठार
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात (Telangana Accident) ट्रक आणि ट्रॉलीची (Truck Accident) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. एल्लारेड्डी मंडलच्या हसनपल्ली गेटजवळ सुमारे 26 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो ट्रॉलीला वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा […]
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात (Telangana Accident) ट्रक आणि ट्रॉलीची (Truck Accident) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. एल्लारेड्डी मंडलच्या हसनपल्ली गेटजवळ सुमारे 26 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो ट्रॉलीला वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा रुग्णालयात नेत असताना आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुमारे 17 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published on: May 09, 2022 02:21 PM