तेरणाचा ताबा अखेर शिवसेनेच्या Tanaji Sawant यांच्याकडे

तेरणाचा ताबा अखेर शिवसेनेच्या Tanaji Sawant यांच्याकडे

| Updated on: Jun 18, 2022 | 12:52 AM

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने राबविलेली निविदा प्रक्रिया कायदेशीर ठरवत भैरवनाथ उद्योग समूहाला दिलेले टेंडर योग्य असल्याचा निकाल दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 25 नोव्हेंबर 2021 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेत आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला भाडेतत्वावर दिला.

उस्मानाबाद : तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याची न्यायालयीन लढाई भैरवनाथ साखर समूहाने जिंकली. शिवसेना आमदार तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाकडे तेरणा भाडेतत्वावर जाणार आहे. डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण ) ने तेरणा कारखानाबाबत ट्वेंटीवन शुगरची याचिका फेटाळली आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने राबविलेली निविदा प्रक्रिया कायदेशीर ठरवत भैरवनाथ उद्योग समूहाला दिलेले टेंडर योग्य असल्याचा निकाल दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 25 नोव्हेंबर 2021 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेत आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला भाडेतत्वावर दिला.

Published on: Jun 18, 2022 12:52 AM
Nitin Gadkari visit Kelkar Museum | नितीन गडकरींची केळकर वस्तुसंग्रालयाला भेट दिली
Bhagat Singh Koshyari Birthday | राज्यपालांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंबीय राजभवनी