‘येथे उद्धव ठाकरे गटाचा आमदार, खासदराच निवडून येणार’; राऊत यांची राठोड आणि गवळीवर याच्यावर टीका

| Updated on: Jul 09, 2023 | 1:42 PM

राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत. 9 आणि 10 जुलै रोजी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

यवतमाळ : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्धार केला आहे. ते आता थेट मैदानात उतरले आहेत. तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत. 9 आणि 10 जुलै रोजी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे देखिल यवतमाळ येथे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. याचदरम्यान त्यांनी शिंदे गटाचे आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळींवर नाव न घेता टीका केली. तसेच येती लोकसभा असो किंवा विधानसभा येथे फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच आमदार आणि खासदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात द्वेष आणि प्रचंड राग असल्याचेही ते म्हणाले.

Published on: Jul 09, 2023 01:42 PM
“मुख्यमंत्री शिंदेंचा पचका, अजितदादांचं दादापण संपलं;” सामनातून जहरी टीका
“देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र, राज्य सरकार बरखास्त करा”, संजय राऊत यांची टीका