Special Report | Rana दाम्पत्यांवर ठाकरे सरकारकडून राजद्रोहाचा गुन्हा दाखल

Special Report | Rana दाम्पत्यांवर ठाकरे सरकारकडून राजद्रोहाचा गुन्हा दाखल

| Updated on: Apr 24, 2022 | 10:33 PM

राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप असल्याचं न्यायालयाला सांगितलं.

अमरावती : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर राज द्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप असल्याचं न्यायालयाला सांगितलं. दरम्यान राणा दाम्पत्याने राजद्रोह होईल, अशी कोणती कृती केली? याचे पुरावे पोलिसांना न्यायालयाकडे द्यावे लागतील, त्यानंतर न्यायालय ते पुरावे पडताळून पाहील, त्यानंतरच राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या कलमाखाली आरोपी आहेत किंवा नाही हे सिद्ध होईल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

Special Report | कारवाई राणांवर…पण इशारा भाजपला?
Special Report | नारा मनसेचा, पुकारा राणांचा,हल्ला सोमय्यांवर