Coronavirus Vaccine | महाराष्ट्रात मोफत लसीकरणाचा ठाकरे सरकारचा निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे
मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे.(Thackeray government's decision to provide free vaccinations in Maharashtra, Rajesh Tope)
मुंबई: राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे.