भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय?; सामनातून टीका

| Updated on: Apr 06, 2023 | 10:23 AM

फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्याना फडतूस नाही तर काय म्हणायचे? असा सवाल केला आहे

मुंबई : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला मारहाण झाल्यानंतर भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार लागली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी फडतूस म्हटल्यानंतर फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतुस असल्याचे म्हटलं होतं. त्यावरून सामानाच्या अग्रलेखातून जहरी टीका करण्यात आली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील समाचार घेण्यात आला आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्याना फडतूस नाही तर काय म्हणायचे? असा सवाल केला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वकतव्यांचा समाचार घेताना, महाराष्ट्राचे सरकार ‘नपुंसक’ आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? ‘नपुंसक’ किंवा ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ या ‘बावन’ आण्यांनी समजून घेतला पाहिजे.

Published on: Apr 06, 2023 09:37 AM
आज हनुमान जन्मोत्सव, खासदार नवनीत राणा 21 वेळा हनुमान चालिसा पठण करणार
चंद्रकांत खैरे हनुमानाच्या चरणी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी नेमकं काय साकडं घातलं?