‘विश्वगुरु अमेरिकेत …पण मणिपूरमध्ये जायला वेळ नाही’; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात

| Updated on: Jun 19, 2023 | 7:17 AM

त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यावरून टीका केली आहे. तर सत्तेची मस्ती आणि फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये पाठवा असं म्हटलं आहे. ते शिवसेनेच्या महाशिबीरातून बोलत होते.

मुंबई : मणिपूर येथे मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकराकडून प्रयत्न केले जाता आहेत. यादरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यावरून टीका केली आहे. तर सत्तेची मस्ती आणि फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये पाठवा असं म्हटलं आहे. ते शिवसेनेच्या महाशिबीरातून बोलत होते. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना थेट आव्हान करताना, ईडी-सीबीआयचे अधिकारी मणिपूरमध्ये पाठवा. जातायत का बघा आणि गेले तर परत येतायत का बघा. जाळून टाकतील. तिकडे लोकं अमित शाह यांनाही जुमानत नाहीत. अमित शाह यांनी काय केलं? असंही म्हटलं आहे. मोदी अमेरिकेत चालले आहेत, पण मणिपूरला जायला तयार नाहीत. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन तुम्ही विकत घेतलेल्या लोकांसमोर तुमचं ज्ञान पाझळणार अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

Published on: Jun 19, 2023 07:17 AM
“लंडनमध्ये 50 खोके म्हटल्यावर फॉरेनरही म्हणाला एकदम ओके”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
‘दो मस्ताने चले, चुना लगा के…’; संजय राऊत यांची कोणावर जोरदार हल्ला?