‘गांधी घराण्यावर गरळ ओकल्यामुळेच…’; स्मृती इराणी यांच्यावर ठाकरे गटाच्या महिला नेत्याची टीका

| Updated on: Aug 10, 2023 | 11:51 AM

या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तर जोरदार टीका देखील केली. यानंतर केंद्रीय महिला आणि बालविकास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी थेट राहुल गांधी यांच्यावर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केलाय.

मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । केंद्र सरकारवर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला असून त्यावर दुसऱ्या दिवशीही जोरदार चर्चेला सुरुवात झाली. या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तर जोरदार टीका देखील केली. यानंतर केंद्रीय महिला आणि बालविकास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी थेट राहुल गांधी यांच्यावर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केलाय. तर त्यांच्यासह भाजपच्या महिला खासदारांनी यावरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार देखील दाखल केली आहे. सध्या या प्रकरणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. तर राजकीय वातावरण देखील तापलेलं असतानाच याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्मृती इराणी यांच्यावर तोषेरे ओढले आहेत. स्मृती इराणी या बाई देशाच्या विकासावर, त्यांच्या खात्याशी संबंधित ध्येयधोरणावर कमी आणि गांधी घराण्यावर गरळ ओकल्यामुळे जास्त प्रसिद्ध झोतात आल्याची टीका त्यांनी केलीय. प्रसिध्दी झोतात राहण्यासाठी इराणी असे करत आहेत. तर मणिपूरच्या चर्चा टाळण्यासाठी भाजपकडून चाललेला हा सगळा किळसवाणा प्रकार असल्याची घणाघाती टीका अंधारे यांनी केली आहे.

Published on: Aug 10, 2023 11:51 AM
रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये घेतला मोठा निर्णय; सलग तिसऱ्यांदा रेपो रेटवर घेतला हा निर्णय
‘विरोधक अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे सारा देश पाहतोय’; मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधी पक्षांवर टीकास्त्र