हिम्मत असेल तर या भ्रष्टाचार बोला, हे काय गंगाजल आहे का?; राऊत यांचा सोमय्यांवर खोचक टीका

| Updated on: Apr 23, 2023 | 11:58 AM

दादा भुसे, राहुल कुल, गुलाबराव पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे काय? मी कागदपत्र पाठवणार आहे. हिंमत असेल तर बोला. बोला राहुल कुलच्या भ्रष्टाचारावर, बोला दादा भोसले च्या भ्रष्टाचारावर. तुम्ही आमच्या सुपारी घेता. मविआच्या लोकांना त्रास देता. मग हे काय गंगाजल आहे का?

जळगाव : जळगावातील पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. याचवेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेत टीका केली आहे. राऊत यांनी सोमय्यांवर टीका करताना, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सगळ्यांचे भ्रष्टाचार काढत असतात. मग दादा भुसे, राहुल कुल, गुलाबराव पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे काय? मी कागदपत्र पाठवणार आहे. हिंमत असेल तर बोला. बोला राहुल कुलच्या भ्रष्टाचारावर, बोला दादा भोसले च्या भ्रष्टाचारावर. तुम्ही आमच्या सुपारी घेता. मविआच्या लोकांना त्रास देता. मग हे काय गंगाजल आहे का? कोरोना काळामध्ये लोकांचे प्राण जात असताना गुलाबराव पाटलाने शेकडो कोटीचा भ्रष्टाचार केला. हे त्याचे पुरावे आहेत. आता यावर बोला असे आवाहन केलं आहे.

Published on: Apr 23, 2023 11:58 AM
फडणवीस गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळात मोकाट; तुम्ही मांडिला मांडी लावून बसता; राऊतांचा घणाघात
दुपारी कडाक्याचं ऊन अन् संध्याकाळी अवकाळी पाऊस, ऊन-पावसाच्या खेळानं नागरिक हैराण