शिंदे गटाच्या वर्धापन दिनावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘जागतिक गद्दार दिन…’
बंडखोरीनंतर शिंदे गटाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहीर केला असून गोरेगाव इथल्या नेक्से एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मुंबई : शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडखोरीनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन 19 जून रोजी साजरा केला जाणार आहे. तर बंडखोरीनंतर शिंदे गटाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहीर केला असून गोरेगाव इथल्या नेक्से एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने वर्धापन दिनाचा टीझरही लॉन्च केला आहे. यादरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. त्यांनी, शिंदे गटाने वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. शिंदे गटाच्या गद्दारीची नोंद जगातील 33 देशांनी घेतली. त्यामुळे त्यांनी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा.
Published on: Jun 18, 2023 08:10 AM