‘संभाजी भिडे सारखी व्हायात माणसं भाजपने सोडली’; भास्कर जाधव यांची जहरी टीका

| Updated on: Aug 03, 2023 | 9:12 AM

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील गेल्या एका आठवड्यापासून गदारोळ होत आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरूनच काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी देखील टीका केलीय.

मुंबई, 3 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि महापुरूषांसह साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर आता राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील गेल्या एका आठवड्यापासून गदारोळ होत आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरूनच काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी देखील टीका केलीय. याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील जहरी टीका केली आहे. यावेळी संभाजी भिडे सारखी व्हायात माणसं भाजपने सोडली आहेत. जी माणसं राज्यात जातीय दंगली घडवतायत अशी टीका केली आहे. तर देवेंद्र फडणवीस सांगतात भिडे आमचे गुरुजी. त्यामुळे डबल भूमिका भाजप घेताना दिसत आहे. त्यांच्या या अशी भूमिकेमुळे ज्यांच्या हातात सत्ता आहे ते कारवाई करणार का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Aug 03, 2023 09:12 AM
बस आली अन् प्रवाशी झपझप चढले; पुढे बसचं काय झालं? पाहा…
‘आरोप करणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नैतिकतेचा पराभव’; शिवसेना नेत्याची खोचक टीका