कांद्यानं वादां केला; राज्य सरकार फेलच तर केंद्राची फैल्युअरकडे वाटचाल; शिवसेना नेत्याचा घणाघात

| Updated on: Jun 06, 2023 | 2:43 PM

तेलंगणा सरकार कांद्याला 1800 च्या वर भाव देत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राज्यात तेलंगणा सरकारला घुसखोरी करण्यासाठी आपलेच मंत्री मदत करत असल्याचे म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अनेक ठिकाणी हा शेतकरी फक्त पीकाला भाव मिळत नसल्याने घायकुतीला आला आहे. यावरून अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहे. तर तेलंगणा सरकार कांद्याला 1800 च्या वर भाव देत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राज्यात तेलंगणा सरकारला घुसखोरी करण्यासाठी आपलेच मंत्री मदत करत असल्याचे म्हटलं आहे. तर कांदाच काय तर इतर बाबतीत ही हे राज्य सरकार फेल झाले आहे. तर केंद्र सरकार फैल्युअरच्या मार्गावर असल्याची टीका केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजीत शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलत होते. तर राज्य आणि केंद्र सरकारवर नागरिक आणि सर्व घटक त्रस्त असल्याचेही ते म्हणाले.

Published on: Jun 06, 2023 02:43 PM
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वृद्ध, अपंग, अंध भाविकांची परवड? समितीचा भोंगळ कारभार? इ रिक्षा वापराविना पडून
औरंगजेबाचा फोटो झळकावल्याच्या प्रकरणाबद्दल मोठी अपडेट, अटक केलेल्या…